शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'शाहिरी बाणा' कार्यक्रम
schedule07 Jan 26 person by visibility 142 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव (२०२५-२०२६) अंतर्गत आज कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुकनाटय, नकला, लघुनाटिका आणि 'शाहिरी बाणा' यांचे सादरीकरण राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले.
शाहीर पृथ्वीराज माळी आणि परिवार यांच्या 'शाहिरी बाणा' हया कार्यक्रमांतर्गत पारंपारिक वाद्य वादनासह पोवाडा, भारूड, शिवगीते यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, डॉ.रघुनाथ धमकेल, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.विनोद ठाकुरदेसाई, डॉ.प्रल्हाद माने, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, श्रीमती सुरेखा अडके यांचेसह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
▪️ उद्या, कार्यक्रमाच्या तीसऱ्या दिवशी, राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहामध्येे एकल नृत्य, समुह नृत्य आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

