सत्यजीतच्या पाठीमागे उभे रहा! माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहन
schedule08 Jan 26 person by visibility 271 categoryराजकीय
कोल्हापूर : जसे चंद्रकांत आण्णांवर प्रेम केले. तसेच माझ्यावरती ही प्रेम केले. आणि आण्णांनी तुमच्यासाठी केलेले समाजकार्य त्यांचे योगदान असो, आण्णा गेल्यानंतर माझ्या पाठीमागे सत्यजित, तुम्ही उभे राहिलात या सर्वस्वी यशानंतर तुम्ही सत्यजीतच्या पाठीमागे उभे रहा, तसेच तुमची कामे असतील ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करू असा शब्द देत आपले अनमोल मत सत्यजित जाधव तसेच महायुतीच्या उमेदवारांना द्यावे असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी आमदार जयश्री जाधव यांनी केले.
प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव हे निवडणूक लढवत आहेत. याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव यांनी याबाबत आपली भूमिका व्यक्त केली. त्या म्हणाल्या आमच्या घराण्यावर अनेक लोकांनी प्रेम केले. आण्णांनी त्यांची ओळख एक चांगले कार्य करणारे, चांगले कार्यकर्ते, कुटुंबावर प्रेम करणारी व्यक्ती, सर्वांच्या मदतीला धावणारी व्यक्ती अशी अण्णांची ओळख होती. तीच एक आमची जनतेशी नाळ जुळलेली आहे. समाजसेवेच्या माध्यमातून आणि ही समाजसेवा चालू ठेवण्यासाठी सत्यजित जाधव यांना नगरसेवक पदासाठी मैदानात उतरवले आहे. जनतेने जसे आण्णा वरती प्रेम केले. मलाही निवडून दिले. त्याप्रमाणे सत्यजितला ही निवडून देतील. अशी खात्री वाटते. सगळीकडे त्याची चर्चा आहे. जनता कधीच अण्णांना विसरू शकणार नाही आमच्या समाजकार्याला विसरू शकणार नाही हेच आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. असे जयश्री जाधव यांनी सांगितले.
आण्णांचे स्वप्न होते की महिला घरात बसून उपयोग नाही त्यांच्या हातात कला असते पण ते पुढे जात नाही. त्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे आण्णांच्या निधनानंतर घे भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्याचे कार्य चालू आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच भविष्यामध्ये घे भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच अण्णांची जी अपुरी स्वप्न राहिले आहेत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सत्यजितला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.

