SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​​"संविधानाचा खरा सन्मान राखण्याचे काम भाजपकडूनच; काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे" : खा. धनंजय महाडिककागलमध्ये उद्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयांचा प्रवेश समारंभधारावी येथील सुविधा केंद्राला महापौरांची भेट; CSR फंडिंगच्या माध्यमातून कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प!हिंदकेसरी नेर्ली माळ येथे रविवारी भव्य ‘राजेश केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार; लाखो रुपयांची रोख पारितोषिकेकृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणीरगेडियनतर्फे कोल्हापुरात शनिवारी 'मिडनाईट सायकल राईड'; फिट इंडिया अभियानांतर्गत आयोजनपॅलेस्टिनी जनतेशी एकजूट दर्शवणारा आंतरराष्ट्रीय दिनविद्यापीठाच्या ६३व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादशासकीय वसतिगृह व आधार योजनांसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

​​"संविधानाचा खरा सन्मान राखण्याचे काम भाजपकडूनच; काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे" : खा. धनंजय महाडिक

schedule27 Nov 26 person by visibility 197 categoryराजकीय

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात कॉंग्रेस पक्षाने १०६ वेळा बदल केले. मात्र भाजप सरकार संविधान बदलणार अशी अफवा देशभर पसरवली. भाजपने मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाचा सन्मान ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे केल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कौन्सील ऑफ एज्युकेशनच्या पुढारातून संविधान गौरव दिनाचे शहाजी लॉ कॉलेज मध्ये आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापुरातील श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कौन्सील ऑफ एज्युकेशनच्या पुढाकारातून संविधान गौरव दिनाचे शहाजी लॉ कॉलेज मध्ये आयोजन केले होते. खासदार धनंजय महाडिक, चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे आणि महाव्यवस्थापक प्रा. लहुकुमार थोरात, प्रा. मधुकर पाटील, लॉ कॉलेजच्या प्रा. सविता रासम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. पुढील काळात हे विद्यार्थी आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासह विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यांना संविधानाचा संपूर्ण अभ्यास असणे गरजेचे असल्याचे प्रा. खराटे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान भारतवासिय आणि देशाला उंचीवर नेणारे असल्याचे खराटे यांनी सांगितले. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात काही विद्यार्थीनींना संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रा. प्रज्ञा गिरी यांनी, संविधानाचे वाचन केले. दरम्यान विभावरी मोहिते, आफसा खान, ऋचा वारके, पूर्वा जांभळे या विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केलेल्या विद्यार्थीनींचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे. ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाची कृपा आहे. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. देशभरात संविधानाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे प्रा. मधुकर पाटील यांनी सांगितले. दरम्यान संविधान गौरव दिनाचे आयोजन करून, भाजप सरकार आणि खासदार धनंजय महाडिक यांनी, नव्या पिढीत लोकशाही मुल्ये रूजवण्याचा सुरू केलेला प्रयत्न निश्‍चितच गौरवास्पद असल्याचे प्रा. सविता रासम यांनी सांगितले. घटना लिहिण्याचे काम देशभरातील ३९९ सदस्यांनी केले. त्यामध्ये कोल्हापूरचे स्वर्गीय आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा समावेश होता. ही बाब कोल्हापूर वासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सभागृहात निवडून येवू नयेत, यासाठी प्रयत्न केले. त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. ज्यांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अप्रत्यक्षरित्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याची टिका खासदार महाडिक यांनी केली. मात्र भाजपनेच डॉ. आंबेडकर यांचा सन्मान आणि संविधानाचा जागर केला. डॉ. आंबेडकरांच्या महुआ इथल्या जन्मस्थळाला केंद्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. लंडन मधील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान विकत घेवून, ते आंतरराष्ट्रीय स्मारक बनवले. नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षा भूमीचा विकास केला. दिल्लीतील डॉ. आंबेडकर यांच्या घराचे स्मारक बनवले. मुंबईतील चैत्यभूमी येथे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम राज्य सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान ठेवला, असे खासदार महाडिक म्हणाले. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने २०२४ च्या निवडणूकीत भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. मात्र जनता त्याला फसली नाही. मोदी सरकारने स्टार्टअपच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे देशवासियांच्या मानगुटीवर बसलेले काश्मिरचे ३७० कलम हटवून नागरिकांना दिलासा दिला. मुस्लिम महिलांसाठी त्रिपल तलाकचा कायदा रद्द केला. ओबीसी आणि मागासवर्गीयांसाठी डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी द्वारे थेट खात्यामध्ये अनुदान सुरू केले. त्यांच्यासाठीचे कायदे अधिक मजबुत केले. मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस च्या माध्यमातून  सवलत दिली. त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्याचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला. मुलींसाठी उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमाची फी माफ केली. अशा अनेकविध योजनांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार समाजातील सर्वच घटकांसाठी कार्यरत असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान संविधानाच्या प्रती उपस्थित विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

Settings
Theme
themes