SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हिंदकेसरी नेर्ली माळ येथे रविवारी भव्य ‘राजेश केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार; लाखो रुपयांची रोख पारितोषिकेकृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणीरगेडियनतर्फे कोल्हापुरात शनिवारी 'मिडनाईट सायकल राईड'; फिट इंडिया अभियानांतर्गत आयोजनपॅलेस्टिनी जनतेशी एकजूट दर्शवणारा आंतरराष्ट्रीय दिनविद्यापीठाच्या ६३व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादशासकीय वसतिगृह व आधार योजनांसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढराज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान

जाहिरात

 

हिंदकेसरी नेर्ली माळ येथे रविवारी भव्य ‘राजेश केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार; लाखो रुपयांची रोख पारितोषिके

schedule27 Nov 26 person by visibility 101 categoryक्रीडा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील ऐतिहासिक हिंदकेसरी नेर्ली माळ येथे रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर  रोजी सकाळी ९ वाजता भव्य ‘राजेश केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिवसेना शहर संघटक तथा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समितीचे कोल्हापूर अध्यक्ष आदर्श जाधव हे असून, आज (शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर) कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली.

 कोल्हापूरच्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीचा वारसा जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


स्पर्धेत एकूण चार गटांमध्ये चुरशीच्या लढती होणार असून विजेत्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे आणि प्रत्येक गटातील गाडीवानासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 

यामध्ये जनरल गटासाठी प्रथम क्रमांक ₹ १,११,९९९/-, द्वितीय क्रमांक ₹ ७५,०००/- आणि तृतीय क्रमांक ₹ ५१,०००/- असून प्रवेश फी १०% आहे. ब गटासाठी प्रथम क्रमांक ₹ १,००,०००/-, द्वितीय क्रमांक ₹ ७५,०००/- आणि तृतीय क्रमांक ₹ ५१,०००/- बक्षीस आहे. दुस्सा चौसा गटासाठी प्रथम क्रमांक ₹ ३१,०००/-, द्वितीय क्रमांक ₹ २१,०००/- आणि तृतीय क्रमांक ₹ ११,०००/-, तर बिनदाती आदत गटासाठी प्रथम क्रमांक ₹ २१,०००/-, द्वितीय क्रमांक ₹ १५,०००/- आणि तृतीय क्रमांक ₹ ७,०००/- अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेच्या नियमानुसार शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत गाड्यांची नोंदणी करून घेतली जाईल व रात्री ८.३० वाजता ऑनलाइन लॉट्स पाडले जातील, त्यानंतर नोंद केलेल्या गाड्या शेवटी उभा केल्या जातील. सदर मैदान हे शासनाच्या व छत्रपती शाहू रेसिंग असोसिएशन, कोल्हापूर यांच्या नियमानुसार होईल. दुस्सा चौसा व आदत गटाचे दात तपासले जातील आणि तक्रार प्राप्त झाल्यास ड्रोनद्वारे पाहणी करून बक्षीस दिले जाईल. असोसिएशनने बंदी घातलेल्या बैलांना व गाडीवानास प्रवेश दिला जाणार नाही, तसेच जनरलच्या बैलांना ब गटात प्रवेश मिळणार नाही. ढकली, काठी, बॅटरी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. ब गट, दुस्सा चौसा व आदत गटासाठी १५ टक्के प्रवेश फी असेल; दोन गट झाल्यास बक्षीस रक्कम पूर्ण दिली जाईल, तर एक गट झाल्यास ५ टक्के प्रवेश फी परत केली जाईल. स्पर्धेदरम्यान दुखापत किंवा अपघात झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी ९१४२४२९०९९ किंवा ९१४३४३९०९९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर व कसबा बावडा, नेर्ली व हळसवडे शर्यत शौकीन तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. 

प्रेस क्लब, कोल्हापूर येथे झालेल्या या पत्रकार बैठकीस कुणिल जाधव, आदर्श जाधव, रोहन उलेपे, सौरभ कुलकर्णी, समरजीत मोहीते, सागर चव्हाण, अक्षय खोत आणि अमोल नवले हे मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes