SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठाच्या ६३व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादशासकीय वसतिगृह व आधार योजनांसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढराज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदानघोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवू

जाहिरात

 

विद्यापीठाच्या ६३व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ

schedule26 Nov 26 person by visibility 127 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त समारंभास आजपासून ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि ‘संत ज्ञानेश्वर माऊली सार्थसप्तशताब्दी’ सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांनी सुरवात झाली. उद्या सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मुख्य दीक्षान्त समारंभ होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शहरवासियांच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने ही बाब अधोरेखित केली.

आज सकाळी कमला महाविद्यालय येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा, भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्रग्रंथ, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आधुनिक विज्ञानाविषयीचे ग्रंथ आणि नुकतीच शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ हे सुप्रसिद्ध आत्मचरित्रही ठेवण्यात आले होते.

कमला महाविद्यालयापासून टाळमृदंगासह ढोलताशाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे दिंडी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहात होता.

ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय साळी, डॉ. क्रांतीकुमार पाटील, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उप-ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील यांच्यासह बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांतील समन्वयक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रंथदिंडीमध्ये विविध महाविद्यालयांतील ग्रंथपालही सहभागी झाले.

यंदाच्या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींचे संचलनही लक्षवेधक ठरले.

वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची पर्वणी

ग्रंथदिंडीनंतर सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून हे उद्घाटन झाले. महोत्सवात एकूण २८ स्टॉल आहेत. त्यामध्ये ९ खाद्यपदार्थ व पेयविक्रीचे तर एक आभूषणांचा स्टॉल आहे. स्थानिकांसह बाहेरगावचेही १४ प्रकाशक व ग्रंथविक्रेते सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, वाणिज्य, एमबीए, समाजशास्त्र अधिविभाग आणि एसयूके-आरडीएफ या विभागांनीही सहभाग घेतला आहे. या सर्व स्टॉलची कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांनी फिरून पाहणी केली आणि सहभागींना शुभेच्छा व धन्यवाद दिले. यावेळी कुलगुरू व प्र-कुलगुरूंनी वैयक्तिक स्वतःसाठी काही ग्रंथांची खरेदी केली. त्याचप्रमाणे काही नव्याने प्रकाशित झालेल्या ग्रंथांची विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्याच्या सूचनाही ग्रंथालयातील अधिकाऱ्यांना केल्या.

दरम्यान, दुपारच्या सत्रात राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात ‘संत ज्ञानेश्वर माऊली सार्थसप्तशताब्दी: विद्वत परिषद’ हा आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही करण्यात आला. उपस्थितांचा त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes