+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule08 Jul 24 person by visibility 374 categoryउद्योग
जयसिंगपूर : सहकारमहर्षी स्व. शामरावआण्णा पाटील-यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या व शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव बँकेने गत आर्थिक वर्षात व्यवसायवृद्धी आणि विस्तारासह ग्राहकांना नूतन अद्ययावत डिजिटल बँकिंग सेवा व सुविधा देत लक्षणीय प्रगती केली आहे. आता लवकरच ही बँक मल्टिस्टेट करू, असे प्रतिपादन यड्राव बँकेचे चेअरमन अजय राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

 जयसिंगपूर येथे द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या यड्राव बँकेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम प्रमुख उपस्थित होते, सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सहकाररत्न स्वर्गीय शामरावआण्णा पाटील-यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. बँकेचे व्हा. चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी सर्वच १३ विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर म्हणाले, बँकेने १८२ कोटींच्या ठेवीं पूर्ण केल्या आहेत. बँकेने ३०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल. बँकेच्या सभासदांना ९% प्रमाणे डीव्हिडंट देण्यास मंजुरी दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला, 

सभेसाठी शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर, लेखा परीक्षक व्ही. के. बस्तवाडे यांचेसह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सदस्य अनिल बागणे, आशिष मुरचिट्टे, कुमार उपाध्ये व शरद सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी तसेच बँकेचे संचालक भरतकुमार चौगुले, धन्यकुमार पाटील-पाराज, वैभव कर्वे, प्रशांत अपीने, प्रदीप चौगुले, विशाल आवटी, संजय पाटील, धन्यकुमार सिदनाळे, युवराज शाह, त्रिशला संजय पाटील यड्रावकर, कल्पना मोरे, सुरेंद्र जंगम, मोहन प्रभाळकर, शिवाजी बेडगे, यांचेसह तज्ज्ञ संचालक सचिन देशिंगे व श्री निलेश पाटील ( सी. ए. ) उपस्थित होते. सचिन देशिंगे यांनी आभार मानले. सभेचे सूत्रसंचलन बबन यादव यांनी केले.