SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादनशक्तीपीठ महामार्गा विरोधात शेतकऱ्याची गुरुवारी ऑनलाईन राज्यव्यापी बैठकशाहू जयंतीनिमित्त कार्यक्रमांतून राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य रुजवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे शाहू महाराजांप्रती बहुजन समाजाने कृतज्ञ असावे: इंद्रजीत सावंत; शिवाजी विद्यापीठात छत्रपती शाहू जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानसुतारवाडा, चित्रदुर्ग मठ व सारस्वत वस्तीगृह या निवारा केंद्रास प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची भेटडीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवडकैलास गडची स्वारी मंदिर विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपलाकाळम्मावाडी थेट पाईप लाइन योजनेच्या मेन विद्युत पुरवठा लाइनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर बसविण्यास प्रशासकांची मान्यताकराड ते चिपळून मार्गावरील वाहतुकीत 27 जून अखेर बदलआणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

जाहिरात

 

काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजनेच्या मेन विद्युत पुरवठा लाइनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर बसविण्यास प्रशासकांची मान्यता

schedule25 Jun 25 person by visibility 193 categoryराज्य

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 33kV(33000volt) मेन विद्युत पुरवठा लाइनमध्ये वेळोवेळी काही तांत्रिक बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे या मेने विद्युत पुरवठा लाईनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर बसविण्यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या कामासाठी रक्कम रु. 29 लाख इतका खर्च महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.

 काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजनेच्या मेन विद्युत पुरवठा लाइनमध्ये काही नादुरुस्ती झालेस तातडीने सदर विद्युत लाइन दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका आणि महावितरण यांच्या वेळावेळी बैठका होऊन यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाल्या.

  या बैठकांमध्ये राधानगरी EHV Sub-station मधून link लाईन जोडणी करणे व मेन लाइन वर 7 आयसोलेटर स्विच उभारणे बाबत महावितरण मार्फत पर्याय देण्यात आला होता. यामध्ये मेन लाईनवर काही बिघाड झालेस या आयसोलेटरद्वारे तातडीने ती लाईन दुरुस्ती करणे शक्य आहे. त्यामुळे शहर पाणी पुरवठा विभागास महावितरणने रक्कम रु. 29.00 लाखाच्या अंदाजपत्रक सादर केले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच महावितरण मार्फत या योजनेच्या मुख्य लाईनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर उभारणीचे काम सुरु करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes