SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणीसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; १३ विषयाचा निकाल १०० टक्के वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधवछत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादनशक्तीपीठ महामार्गा विरोधात शेतकऱ्याची गुरुवारी ऑनलाईन राज्यव्यापी बैठकशाहू जयंतीनिमित्त कार्यक्रमांतून राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य रुजवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे शाहू महाराजांप्रती बहुजन समाजाने कृतज्ञ असावे: इंद्रजीत सावंत; शिवाजी विद्यापीठात छत्रपती शाहू जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानसुतारवाडा, चित्रदुर्ग मठ व सारस्वत वस्तीगृह या निवारा केंद्रास प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची भेटडीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवडकैलास गडची स्वारी मंदिर विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपला

जाहिरात

 

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

schedule26 Jun 25 person by visibility 185 categoryराज्य

▪️पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्प अर्पण

कोल्हापूर : १५१ व्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.

 याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जेष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. शिक्षण सर्वांसाठी खुले केले, आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि जातीभेद निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या समाजाला दिशा देत आहे.

या प्रसंगी, महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करून, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया असा संकल्प सर्वांनी केला. शाहू महाराज जन्मस्थळी विविध मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes