SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील एस.टी. बसेसच्या इन-आऊट प्रवेशामध्ये बदल‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद, फलटण येथे साहित्य वाटप...दोन चोरट्याकडून गडिंग्लज तालुक्यातील ५ चोरीचे गुन्हे उघडकीस; १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला होणार सुरुवात : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये रोजगार मेळावा उत्साहात; स्वप्नपूर्तीमुळे तरुणांना आनंदपरिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार; शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणीकोल्हापुरात प्रलंबित आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे ॲड.आशिष शेलार यांना निवेदन कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करण्याचा निर्धार; नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घातले लक्ष"राजर्षी शाहू प्रजावत्सल, दिनदलीतांचे तारणहार,समतचे पुरस्कर्ते व कर्ते समाजसुधारक होते." : डॉ. सुनीलकुमार सरनाईकडी.के.टी.ई. च्या प्रा. व्ही. बी. मगदुम यांना पी.एच.डी. प्रदान

जाहिरात

 

दोन चोरट्याकडून गडिंग्लज तालुक्यातील ५ चोरीचे गुन्हे उघडकीस; १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

schedule28 Jun 25 person by visibility 210 categoryगुन्हे

कोल्हापूर  : दोन चोरट्यास ताब्यात घेवुन एकुण ०५ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले त्यांच्याकडून ४१५ मिटर इलेक्ट्रिक केबल व ०१ मोटर असा एकुण १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कोल्हापूर शाखेने केली.

 तपास पथकामार्फत इलेक्ट्रीक मोटरी व मोटरची केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सतिश जंगम यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा हा विश्वनाथ हुदली व त्याचा साथीदार यांनी केला आहे. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथक दिनांक २८/०६/२०२५ रोजी नमुद आरोपींचा तेरणी, ता. गंडहिंग्लज येथे शोध घेत असताना आरोपी नामे १) विश्वनाथ इराप्पा हुदली वय ३१, रा. बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, २) कऱ्याप्पा फकीरअप्पा उदनायक वय २८, रा. तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, मुळ गाव सुनकुंपी, ता. बैलहोंगल, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक हे तेरणी ते बुगडीक‌ट्टी जाणारे रोडवर तेरणी, ता. गडहिंग्लज येथे गावचे हद्दीत दुंडव्वा भिमा भोई यांचे मालकीचे पत्र्याच्या शेडचे दारात मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून तेथील पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेली चोरीच्या गुन्ह्यातील केबल काढुन दिली आहे. तसेच सदर शेडची तपासणी केली असता सदर शेडमध्ये आणखिन केबली व एक मोटर मिळुन आलेने त्याबाबत विश्वनाथ इराप्पा हुदली याच्याकडे तपास केला असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास अधिक विश्वासात तपास केला असता त्याने, मोटर व केबल ह्या स्वतः गडहिंग्लज येथील वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरल्या असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील ४१५ मिटर इलेक्ट्रिक केबल व ०१ इलेक्ट्रीक मोटर असा एकुण १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गडहिंग्लज पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

आरोपी नामे विश्वनाथ इराप्पा हुदली याचेवर कर्नाटक राज्यात कॉपर चोरीचे एकूण ७९ गुन्हे आहेत.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  योगेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार सतिश जंगम, दिपक घोरपडे, प्रविण पाटील, रोहीत मर्दाने, समीर कांबळे, अमित सर्जे, राजु कांबळे, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, हंबीरराव अतिग्रे, अमित मर्दाने यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes