कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील एस.टी. बसेसच्या इन-आऊट प्रवेशामध्ये बदल
schedule28 Jun 25 person by visibility 177 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एस.टी. बसेसच्या इनगेट व आऊटगेट प्रवेशा बाबत बदल करुन सध्या सुरु असलेल्या आऊट गेट मधुन एसटी बसेस बसस्थानकाचे आत प्रवेश करीतल व इनगेट मधुन बाहेर जातील. सदर वाहतुक नियोजनाबाबत प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरामध्ये मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये मोटर वाहनांची वाहतुक मोठया प्रमाणात होत असते. मध्यवर्ती बसस्थानक मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या इनगेट व आऊटगेट मधुन जाणा-या येणा-या बसेसमुळे सदर रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.
सध्या असलेल्या इन गेट व आऊट गेट च्या मध्ये केएमटी बसस्टॉप असलेने त्याठिकाणीही बसेसची वर्दळ असते. आऊट गेट मधुन एस.टी. बस बाहेर पडत असतानाच केएमटी बसस्टॉपवरही काही वेळा केएमटी बस उभी असते व त्याच वेळी इनगेट मधुनही काही बसेस जात असतात त्यामुळे वारंवार वटेश्वर मंदिर पर्यंत अनेक वाहने थांबुन अडथळा होत आहे. सदर मार्गावर दिवसभरात अनेक वेळा वाहतुक कोंडी होत आहे नियमीत पणे होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरीकांच्या सुरक्षेस, एस.टी. ने प्रवास करणा-या प्रवाशांच्या सुरक्षेस धोका निर्माण होऊ शकतो.
परिणामी, नमुद परिसरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असलेने पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी निर्देश जारी केलेले आहेत.