SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दोन चोरट्याकडून गडिंग्लज तालुक्यातील ५ चोरीचे गुन्हे उघडकीस; १,३३,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला होणार सुरुवात : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये रोजगार मेळावा उत्साहात; स्वप्नपूर्तीमुळे तरुणांना आनंदपरिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार; शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणीकोल्हापुरात प्रलंबित आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे ॲड.आशिष शेलार यांना निवेदन कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करण्याचा निर्धार; नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घातले लक्ष"राजर्षी शाहू प्रजावत्सल, दिनदलीतांचे तारणहार,समतचे पुरस्कर्ते व कर्ते समाजसुधारक होते." : डॉ. सुनीलकुमार सरनाईकडी.के.टी.ई. च्या प्रा. व्ही. बी. मगदुम यांना पी.एच.डी. प्रदानकोल्हापूर जिल्ह्यात 10 जुलै पर्यंत बंदी आदेश लागूतळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला पद्मश्री डॉ.जब्बार पटेल भव्य सोहळ्यात यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान

जाहिरात

 

परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार; शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणी

schedule28 Jun 25 person by visibility 132 categoryराजकीय

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथील त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी सोबत आमदार अमल महाडिक, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्व विभागाचे उदय सुर्वे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, पुराभिलेख सहसंचालक दिपाली पाटील उपस्थित होते. 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शाहू जन्मस्थळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या ठिकाणी असणाऱ्या समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन परिपूर्ण अशा शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच घेऊ अशी ग्वाही दिली. तसेच आवश्यक निधीही कमी पडणार नाही असे सांगितले. 

भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी शाहू जन्मस्थळ येथील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली तसेच परिसरातील सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. शाहू जयंतीदिनी सुरू झालेल्या होलोग्रफिक शोच्या ठिकाणी थिएटरची पाहणी करून शाहू महाराजांवरील लघुपट व होलोग्रफिक शो पाहिला. भेटीत लक्ष्मी विलास पॅलेस मधील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी शाहू महाराजांचा इतिहासही जाणून घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes