महाराष्ट्र- पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी ११वी घुमान यात्रा; २७ ऑक्टो. ते ६ नोव्हेंबर पर्यंत
schedule14 Jul 25 person by visibility 304 categoryसामाजिक

नांदेड (डॉ संदीप प्रभुगावकर) : महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. नानक साई फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही यात्रा २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होत आहे. या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे, महाराष्ट्र - पंजाबमधील बंधुत्व वृद्धिंगत करणे, राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे.. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन करणे, हे आहे.
या यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये : संत नामदेव महाराजांची कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे, तसेच पंजाब- हिमाचल प्रदेश -दिल्ली -हरियाणा राज्यातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. दिल्ली, शिमला, चंदिगड, अमृतसर, भटिंडा, वाघा बॉर्डर, कुरुक्षेत्र, नैना देवी शक्तीपीठ, कार्तिक स्वामी, आनंदपुर साहिब,फत्तेगड साहिब, भाक्रा नांगल धरण,भद्रकाली माता मंदिर, पानिपत, जालियनवाला बाग, बस्सी पठाना,लव-कुश जन्मभूमी आणि श्री क्षेत्र घुमान या स्थळांचा यावर्षी च्या यात्रेत समावेश राहणार आहे. राष्ट्रभक्तीचा अनुभव,परिवारासह प्रवासासाठी योग्य,आध्यात्मिक व पर्यटनाचा संगम,पंजाबी मेहमाननवाजी व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी कौटुंबिक सहलीत सहभागी होण्यासाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे.
भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी या वर्षीची ‘घुमान यात्रा’ नक्कीच आनंदवारी ठरेल, असे मत गोवा येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ संदीप प्रभुगावकर यांनी करवीर काशीशी बोलताना व्यक्त केले.