अंगणवाडी सेविका मदतनीसंचा कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा; एफ आर एस बाबत आठ दिवसात निर्णय न झाल्यास बहिष्कार : कॉम्रेड आप्पा पाटील
schedule14 Jul 25 person by visibility 619 categoryसामाजिक

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसात निघालेल्या मोर्चा सेविकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदचा परिसर दुमदुमून गेला होता.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत व एफ आर एस बाबत येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास एफ आर एस वर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .अंगणवाडी सेविकांचे मानधन तात्काळ मिळावे ,प्रोत्साहन भत्ता तात्काळ मिळावा ,शासकीय कर्मचारी मान्यता मिळावी, एफ आर एस कामाची सक्ती करू नये, मोबाईलचे रिचार्ज रक्कम तात्काळ मिळावे या व इतर मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
सुरुवातीला सर्व सेविका व मदतनीस या महावीर गार्डन येथे जमून येथून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आले व स्थानिक पातळी वरील मागण्या येत्या आठ दिवसात सोडवले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला
यावेळी कार्तिकेयन यांनी आपल्या स्तरावरील मागण्यांचे तात्काळ निराकरण केले जाईल व वरिष्ठ कार्यालयास निवेदन पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी मोर्चासमोर कॉम्रेड आप्पा पाटील ,जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे , शमा पठाण, अंजली क्षीरसागर, नंदा भोरे, अनिता कांबळे,सावित्री मस्के, मंगल माळी ,अर्चना पाटील, अनिता माने, मंगल लोळगे, विद्या कांबळे, भारती कुरणे यांची भाषणे झाली मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सेविका मदतनीस उपस्थित होत्या.
