पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे कळंबा येथे आयोजन
schedule14 Jul 25 person by visibility 221 categoryसामाजिक

कोल्हापूर : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि डॉ.डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, साळोखेनगर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत डॉ.डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कळंबा रिंग रोड, साळोखेनगर, कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अधिकारी कौशल्या पवार यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 200 पेक्षा जास्त रिक्त पदे या मेळाव्याकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असेही श्रीमती पवार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.