कोल्हापूर जिल्ह्यात 12 शेतकरी नोंदणी केंद्रे सुरु
schedule18 Nov 25 person by visibility 47 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदीसाठी सात धानाची (भात)तर पाच रागी (नाचणी) अशी एकूण 12 खरेदी नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली असून त्यासाठी शेतकऱ्यांनी 30 नोंव्हेंबर पर्यंत संबंधित नोंदणी केंद्रावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांनी संयुक्तरित्या केले आहे.
आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा(रागी(नाचणी), चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे (अडकुर) (रागी(नाचणी), कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर (केंद्र- बामणी) (धान(भात), भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी, ता. भुदरगड (दासेवाडी) (धान(भात) (रागी(नाचणी), भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी, ता. भुदरगड केंद्र- कडगाव(धान(भात), राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे तालुका राधानगरी(धान(भात) (रागी(नाचणी),चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, (धान(भात) शेतकरी विकास शेतीमाल उत्पादन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित रांगोळी, ता. हातकणंगले, केंद्र- गडहिंग्लज (रागी(नाचणी) या केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.
शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी रु.2 हजार 369 व रागी (नाचणी) करिता 4 हजार 888 प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी करिता शेतक-यांचा चालु (2015-16) हंगाम मधील धान (भात) व नाचणी पिकपे-याची नोंद असलेला 7/12 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. तसेच शेतक-यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक असल्यास शेतकऱ्यांना फोटो करीता केंद्रावर स्वत: उपस्थित रहावे लागणार आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करणे गरजेचे असुन नोंदणीकृत शेतक-यांची खरेदी करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापुर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.