नाशिक येथील आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरचा पाचवा क्रमांक
schedule18 Nov 25 person by visibility 79 categoryक्रीडा
कोल्हापूर : नाशिक देवबंद हॉल पंचवटी येथे 11ते 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल रेटींग स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरने 8 फेरीत खेळताना दुसऱ्या बोर्डवर जतेल ढाक फिडे रेटेड 2023 मुंबई यांच्या शी डावत पराभव झाला त्या मुळे 7 गुण मिळवून खुल्या गटात 5 क्रमांक मिळवला 8000 रुपयेचे पारितोषिक आणि चषक पटकावला आणि 51.6 फिडे रेटिंगची कमाई केली स्पर्धा 7.5 गुण प्रथम मिळवून कोल्हापूर जिल्हातील रेंदाळचा श्रीराज भोसले यांनी अजिंक्यपद मिळवले अजिंक्यपद मिळविले त्याला 35000 रुपयेचे पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले स्पर्धला दोन्ही खेळाडूने प्रत्येक फेरीला एक तास 30 मिनिट अधिक 30 सेकंड अशी घड्याळ वेळ आहे.
आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल बुद्धिबळ रेटींग स्पर्धेत दोन आय एम, 318 आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित91 सह 236 खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेला एकूण 300000 रुपये पारितोषिक होती.
ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.