हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
schedule17 Nov 25 person by visibility 63 categoryसामाजिक
कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखा क्रमांक ३ बाल हनुमान मित्र मंडळाच्या हॉलमध्ये उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण व शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी "अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे", " परत या परत या बाळासाहेब परत या" या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव सरपंच मधुकर चव्हाण, अरविंद शिंदे, विराग करी, दिपक रेडेकर, दिनकर पोवार, सुनील चौगुले,सागर पाटील, योगेश लोहार, दत्ता फराकटे, सागर नाकट, विनय शिरसागर, आबा जाधव,दत्तात्रय विभुते, रामराव पाटील, रणजीत गाताडे, रोहन यादव,बाळासाहेब हाके,भागवत ढाकणे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.