SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस७००हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे?डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवडवाढत्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिनव 'विडंबनात्मक' आंदोलनआपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड बेळगावच्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात कोल्हापूरचा डंका! ३ महिला कवयित्रींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानजागतिक उच्च रक्तदाब दिन: शांत आव्हानाचा सामना करण्यासाठी जागरूकतेची गरज'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावा

जाहिरात

 

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

schedule17 May 26 person by visibility 147 categoryशैक्षणिक

तळसंदे : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या 132 विद्यार्थ्यांची  विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळाले आहे. 

महाविद्यायाद्वारे घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये जे एन के, मुंबई कंपनीमध्ये मेकॅनिकल विभागाच्या अर्जुन जाधव, शुभम पाटील या दोघांची ४ लाख प्रतीवर्ष पॅकेज वरती निवड करण्यात आली. एसकेएचएम या कंपनीत ४, बजाज ऑटोमध्ये ५, टी ई कनेकटीव्हिटी या कंपनीत ९२ विद्यार्थ्यांचे,  तसेच विडजेन इंडिया या कंपनीमध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड झाली.  या विद्यार्थ्यांना सरासरी दोन ते अडीच लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.

टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि महाविद्यालयाकडून देण्यात येत असलेल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे हे यश मिळाले आहे. यापुढेही अधिकाधिक विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes