कोल्हापूर : अट्टल घरफोड्यास अटक; 20 लाख रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त; 14 घरफोड्या उघडकीस
schedule10 Apr 25 person by visibility 347 categoryगुन्हे

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने क. बावडा परिसरातील अट्टल घरफोड्या सागर भगवान रेणूसे (वय 36.रा. गोळीबार मैदान, क. बावडा) याला अटक करून त्याच्याकडील 20 लाख रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करून 14 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.
तपास पथकातील पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, सोमराज पाटील, वंसत पिंगळे यांना खात्रीशिर माहिती मिळाली की, शाहुपुरी पोलीस ठाणे, गु.रं.नं. 98/2025, बी. एन. एस. कलम 331 (3), 334(4), 305 प्रमाणे दाखल असणारा घरफोडी चोरीचा गुन्हा हा सागर रेणुसे (रा. कोल्हापूर) याने केला असून तो सध्या कसबा बावडा परीसरात असलेबाबत माहिती मिळाली. मिळालेले माहिती प्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने कसबा बावडा येथुन सागर भगवान रेणुसे वय 36 रा गोळीबार मैदान कसबा बावडा कोल्हापूर यास ताब्यात घेवुन मिळाले माहिती प्रमाणे त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्याने शाहुपुरी पोलीस ठाणे, गु.र.नं. 98/2025, बी. एन. एस. कलम 331 (3), 334(4), 305 प्रमाणे दाखल गुन्हयासह आणखीन घरफोडी चोरीचे गुन्हे केलेची कबुली दिली. त्यानंतर आरोपींकडे सखोल तपास करून आरोपी सागर रेणुसे यांचेकडेन 175 ग्रॅम सोन्याचे दागीने, 2 किलो 650 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तु असा एकूण 20,04,140/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सागर रेणुसे यास अधिक तपासकामी शाहुपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शाहुपुरी पोलीस ठाणे यांचेकडुन सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, सोमराज पाटील, वंसत पिंगळे, संदीप पाटील, सुरेश पाटील, राम कोळी, रुपेश माने, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित सर्जे, विलास किरोळकर यांनी केली आहे.
