कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना 19 एप्रिल रोजी लसीकरण कार्यक्रम
schedule17 Apr 25 person by visibility 263 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 300 हज यात्रेकरूंना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने 19 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये उष्णता प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व हज यात्रेकरूंनी उपस्थित रहावे असे आवाहन हज फौंडेशन,कोल्हापूर आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरू आगामी मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात हज यात्रेला रवाना होणार आहेत, सौदी अरेबिया येथील अति उष्ण तापमानाचा कोणताही दुष्परिणाम हज यात्रेकरूंना होवू नये यासाठी मेनिनजायटीस ही लस या यात्रेकरूंना दिली जाते.त्याचबरोबर 65 वर्षे वयाच्या यात्रेकरूंना इन्फ्लूएंझाची लस सुद्धा देण्यात येते.गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंसाठी हज फौंडेशन,कोल्हापूर आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही सामाजिक संस्था प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहेत
तसेच हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते.हज यात्रेदरम्यान करण्यात येणाऱ्या सर्व धार्मिक विधी व नमाज बद्द्ल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हज यात्रेकरूंना परिपूर्ण माहिती देण्याचे कार्य गेल्या सहा महिन्यांत करण्यात आले आहे अशी माहिती हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इक्बाल देसाई यांनी दिली आहे.