कोल्हापुरात शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच
schedule17 Apr 25 person by visibility 391 categoryगुन्हे

कोल्हापूर : शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना शाळेचे मुख्याध्यापकसंजय जयसिंग नार्वेकर (वय ५२ रा. सांगाव रोड, दत्त कॉलनी, ता. कागल, जि. कोल्हापूर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
रविवार पेठेत शेलाजी वन्नाजी विद्यालय ही शाळा आहे. या शाळेत तक्रारदाराचे वडील आणि पाच चुलते शिकायला होते. सरकारी कामासाठी तक्रारदारांच्या वडील आणि पाच चुलत्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांची भेट घेतली. एक दाखल्याचे पाचशे रुपये या प्रमाणे सहा दाखल्यासाठी मुख्याध्यापकांनी तीन हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. मुख्याध्यापक संजय नार्वेकर तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.