SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवडजगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटीलसीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

schedule25 Aug 26 person by visibility 153 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन आणि वार्षिक महाविद्यालयीन नियतकालिकाच्या अनावरणाचा सोहळा सी-ब्लॉकच्या तळमजल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या १४ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन आणि भावी पिढीला मूल्याधिष्ठित शिक्षणाची दिशा देणाऱ्या या कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर  रूपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती, तर संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले अध्यक्षस्थानी होते.

 इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. योगेश पोवार आणि प्रा. विनायक पावटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी इन्स्टिट्यूटच्या वार्षिक नियतकालिकाचे अनावरण करण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ या विषयावर वैशिष्ट्यपूर्ण कल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच महापौर  रूपाराणी निकम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विश्वस्त विनायक भोसले  यांचा सन्मान केला.

प्रमुख वक्ते राहुल गिरी यांनी विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. “सर्वोत्तम माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करा,” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजतत्त्वज्ञान आत्मसात करावे, आई-वडिलांचे कष्ट आणि संस्कार कधीही विसरू नयेत, असे सांगितले. तंत्रज्ञान शिका, त्याचा उपयोग करा; मात्र तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. जीवन अनमोल असून, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा. केवळ नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घेऊ नका, तर राष्ट्रहिताचे कार्य करण्यासाठी सक्षम व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

संचालक डॉ. विराट गिरी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या १४ वर्षांच्या विद्यार्थी-केंद्रित वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर संस्थेचा भर असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची सिटी बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्याकडे व्यक्त केली.

महापौर  रूपाराणी निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “मंदिराचा कळस भव्य असला तरी त्याचा पाया भक्कम असणे आवश्यक असते,” असे सांगत मजबूत पायाभूत मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे नाव देशपातळीवर पोहोचत असल्याचे नमूद करून विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे, असे आवाहन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार रुजवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात विश्वस्त विनायक भोसले यांनी संस्थेच्या १४व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संजय घोडावत पॉलिटेक्निक सुरू करताना करावा लागलेला संघर्ष आणि त्यातून उभी राहिलेली शिक्षणसंस्था यांचा प्रवास त्यांनी आठवणींतून मांडला. संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या कार्याचा अभिमान असल्याचे सांगत, मूल्याधिष्ठित शिक्षणातून उद्याचा सक्षम नागरिक आणि सक्षम देश घडतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर यांनी केले, तर प्रा. सौ. रजनी अतिग्रे यांनी आभार मानले. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी १४ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes