स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
schedule17 Sep 25 person by visibility 85 categoryआरोग्य

कोल्हापूर : शहरामध्ये 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांशी "स्वस्थ नारी सशक्त परिवार" हे अभियान राबविण्यात येत आहे. "स्वथ नारी सशक्त परिवार " हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत सुरु करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात आज या अभियाना अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये 250 महिला व बालकांनी लाभ घेतला.
या शिबिरामध्ये असंसर्गजन्य रोग, प्रसूती पूर्व तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, क्षयरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्र रोग तपासणी, कान नाक घसा तपासणी, दंत रोग तपासणी, त्वचारोग तपासणी, रक्त तपासणी, मोफत औषध वितरण, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड इत्यादी सेवा व तपासण्या मोफत करण्यात आल्या.
यावेळी उपआयुक्त किरण धनवाडे, आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजना बागडी, डॉ. योगिता भिसे, दि नेशन फस्ट चे अवधूत भाट्ये व सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.
महापालिकेच्यावतीने या मोहिमेअंतर्गत शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, ११ नागरी आरोग्य केंद्रे व आरोग्यवर्धिनी केंद्र या आरोग्य संस्थामध्ये महिला व बालकांकरिता विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.