कोल्हापूर महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींची शुक्रवारी सुनावणी
schedule17 Sep 25 person by visibility 84 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतीची सुनावणी शुक्रवार, दि.19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता होणार आहे. हि सुनावणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्राधिकृत केलेले अप्पर जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यानुसार महापालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत हरकत/सूचना उपस्थित केलेल्या सर्वांना सुनावणीस हजर राहण्यास लेखी कळविले आहे. हि सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी यांचे दालनामध्ये घेण्यात येणार आहे.
या सुनावणीस हरकत दारांनी दिलेल्या वेळेतच उपस्थित राहावे. वेळेत उपस्थित न राहिल्यास पुन्हा सुनावणीस वेळ देण्यात येणार नाही. सुनावणीस येताना आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यावेळी कोणतेही लेखी निवेदन स्विकृत केले जाणार नाही. लेखी हरकत/सूचनेमध्ये जे आक्षेप असतील त्या संबंधी सुनावणी होणार आहे.
सुनावणी झाल्यानंतर कोणतेही लेखी उत्तर दिले जाणार नाही. एखाद्या आक्षेपावर एका पेक्षा जास्त हरकतदारांच्या सह्या असतील तर दोन व्यक्तिंनाचा सुनावणीसाठी घेतले जाणार आहे. तरी हरकतदारांनी या सुनावणीस उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.