SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसंदर्भात कोल्हापुरात चर्चासत्रकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगेधर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटीलपंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूरस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभकोल्हापूर महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींची शुक्रवारी सुनावणीवसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढसंभापूर औद्योगिक वसाहत येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने असल्याने उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे : संस्थेच्या अध्यक्षा, माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहनभागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम

schedule17 Sep 25 person by visibility 60 categoryसामाजिक

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र, मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज गंगावेश चौक आणि शाहू उद्यान या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला गंगावेस चौक परिसर व शाहूद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

 

 कार्यक्रमाच्या सुरवातील उपस्थित पदाधिका-यांनी देशाचे सक्षम, कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य दीर्घायुष्याची पार्थना केली. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.  या कार्यक्रमामध्ये प्लॅस्टिक मुक्तीची शपथ भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनी उपस्थित त्यांना दिली त्याचबरोबर स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस विराज चिखलीकर यांनी केले.

त्याचबरोबर भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये आज भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यामध्ये १७५ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. 

वरील कार्यक्रमांचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक म्हणून भरत काळे, गिरीश साळोखे, रविकिरण गवळी, राजू मोरे, सुनील पाटील यांनी काम पाहिले. 

याप्रसंगी विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, हेमंत आराध्ये, शौलेश पाटील, गायत्री राऊत, विशाल शिराळकर, धीरज पाटील, राजसिंह शेळके, विजयकांत अगरवाल, अतुल चव्हाण, संगीता खाडे, सोमन गवळी, अमेय भालकर, महेश यादव, दिलीप बोंद्रे, विशाल शिराळे, किशोर लाड, सचिन सुतार, संतोष भिवटे, गिरीश साळोखे, डॉ राजवर्धन, प्रताप देसाई, सयाजी आळवेकर, अनिल कामत, अनिकेत अतिग्रे, दिग्विजय कालेकर, श्रीकांत रांगोळे, विश्वजित पोवार, सचिन कुलकर्णी, जयराज निंबाळकर, कोमल देसाई, प्रीतम यादव, तेजस्विनी पार्टे, अश्विनी गोपुडगे, विनय खोपडे, राजगणेश पोळ, शामली भाकरे, माधुरी कुलकर्णी, अप्पा लाड, राजेश कोगनूळकर, मानसिंग पाटील, राहुल घाटगे, प्रकाश कालेकर, अमोल पालोजी, अलका जावीर, संग्राम जरग, सचिन पोवार, संजय जासूद, सुधीर देसाई, किसनराव खोत, योगेश ओटावकर यांच्यासह कार्यकर्ते पदधिकारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes