नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूर
schedule17 Sep 25 person by visibility 56 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत आयोजित केलेल्या विशेष कॅम्पमध्ये आज 64 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन 17 बांधकाम परवानगी, 9 भोगवटा प्रमाणपत्र, 6 एकत्रीकरण विभाजन, 23 ऑर्डर, व 9 गुंठेवारी प्रकरण असे एकूण 64 प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कॅम्पमध्ये मंजूर प्रकरणांमधून महापालिकेच्या महसूलामध्ये 40 लाख 30 हजार 317 रुपये जमा झाले आहेत.
महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या बांधकाम परवानगी व भोगवटा प्रस्ताव कामी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मागदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि.18 सप्टेंबर 2025 रोजी या कॅम्पचा शेवटचा दिवस आहे. तरी आर्किटेक्ट, बांधकाम व्यवसायीक व नागरीकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.
या कॅम्पला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, या कॅम्पमध्ये सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, उपशहर रचनाकार एन.एस. पाटील तसेच कनिष्ठ अभियंता यांनी नागरीकांची कामे तपासून सादर केली. तसेच नागरिकांचा या कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला.