कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 मतदार जनजागृती (SVEEP) अंतर्गत 2700 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळी
schedule11 Jan 26 person by visibility 107 categoryसामाजिकमहानगरपालिका
🔹 मानवी रांगोळी तुन विद्यार्थ्यांचा KMC ELECTION 2025-26 I WILL VOTE चा संदेश, मतदानाबाबत घोषवाक्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मतदार जनजागृती (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर तब्बल 2700 विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रेरणेने तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त किरणकुमार धनवाडे व प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व आंतरभारती शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी मानवी रांगोळीतून “KMC ELECTION 2025–26 – I WILL VOTE” असा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी “मी मतदान करणार” अशी शपथ घेत मतदानाबाबत घोषवाक्य दिली.
या कार्यक्रम प्रसंगी प्रशासक के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी डी सी कुंभार, आंतरभारती शिक्षण मंडळ सचिव एम एस पाटोळे नूतन सचिव भरत शास्त्री शालेय समिती अध्यक्ष संजीव भाई परीख संस्था कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर मुक्त सैनिक वसाहत संस्थेचे चेअरमन अशोकराव भुईंगडे मुख्याध्यापिका व्ही व्ही कुलकर्णी उपस्थित होते.
प्रशासक के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त मा रविकांत अडसूळ, उप आयुक्त मा किरणकुमार धनवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घरातील सर्व नातेवाईक यांना दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात घरातील सर्व मतदारांनी सहभाग घेण्यास सांगणे, पालकांसोबतचा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करणे, मतदान केंद्राबाबत ॲपची माहिती देणे, 15 जानेवारी 2026 सुट्टी असून बाहेरगावी न जाता पालकांना मतदानाचा हक्क बजावणेस घरच्यांना आवाहन करणेबाबत सांगितले.
या मानवी रांगोळीत शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, जय भारत हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर (जाधववाडी), सुसंस्कार हायस्कूल, सुनीतादेवी सोनवणे ज्ञानगंगा हायस्कूल, समता हायस्कूल, माझी शाळा भोसलेवाडी, भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल, सेंट अँथनी स्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मानवी रांगोळीची संकल्पना व व्यवस्थापन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांनी केली. डिझाईन व मायक्रो प्लॅनिंग नागेश हंकारे, आरेखन व व्यवस्थापन राजेंद्र बनसोडे, समीर जमादार, विश्वास माळी, किशोर पाटील, गजानन धुमाळे, दिगंबर गवळी, रमजान मुल्ला, मिलिंद शिंदे, मानसिंग पाटील, अनिल अहिरे, शैलेश कांबळे, सदाशिव हाटवळ यांनी विशेष योगदान दिले.
या टीमने यापूर्वी सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3500 विद्यार्थ्यांमार्फत “देश का महात्योहार” संदेश दिला होता तसेच सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 10500 विद्यार्थ्यांच्या सहभागातून “MY VOTE IS MY FUTURE” ही मानवी रांगोळी साकारून पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद मिळवली होती.
यावेळी कार्यक्रमाधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, संजय शिंदे, श्रावण कोकितकर, विशेष शिक्षक शरद गावडे, आदिती जाधव आदी उपस्थित होते.

