विरोधकांना थेट पाईपलाईन फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आठवते : सतेज पाटील; महाविकास आघाडीची निकम पार्क येथे जाहीर सभा
schedule11 Jan 26 person by visibility 56 categoryराजकीय
कोल्हापूर : विरोधकांना थेट पाईपलाईन फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आठवते. मात्र विरोधक कोल्हापूरासाठी काय करणार हे सांगत नाहीत. ते फक्त माझ्यावर बोट दाखवतात. थेट पाईपलाईन विषयी टीका करत असतात. यामुळे लोकांना मनावर थेट पाईपलाईन ही सतेज पाटील यांनी आणली आहे हे बिंबवण्याचा काम विरोधकांनी केले आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार धनाजी टिपुगडे, प्रणोती पाटील, दीपा मगदूम, राहुल इंगवले यांच्या प्रचारार्थ निकम पार्क परिसरामध्ये आयोजित जाहीर सभेत आमदार सतेज पाटील बोलत होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले कोल्हापुराचा जाहीरनामा करताना लोकांकडूनच सूचना मागवण्यात आल्या. यामध्ये नागरिकांनी आपली मते मांडली तसेच विविध विकास कामाविषयी त्यांची मते आली. यामुळे हा जाहीरनामा तयार करताना माझं स्वप्न कोल्हापूरकरांच्या अपेक्षा यामध्ये आहेत. मात्र विरोधक खासदार यांनी त्यांचा जाहीरनामा ऐवजी काँग्रेसचा जाहीरनामा वरती ते बोलत होते. त्यामुळे विरोधकांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही विरोधकांना आमचा जाहीरनामा सांगावा लागतो हा जो जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. तो कोल्हापूरच्या विकासाचा समृद्धीचा कोल्हापूरला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले निवडणुका या बिनविरोध होत आहेत. लोकांना लोकशाहीच्या हक्कापासून मतदानाच्या अधिकारापासून दूर व्हावे लागत आहेत. भाजपच्या काळात हे चित्र आहे. गेल्या विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये दहा आमदार महायुतीचे आले परंतु दहा आमदारांची गेल्या वर्षभरात योगदान काय असा प्रश्न करून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ताजी टिपूगडे, प्रणोती पाटील, दीपा मगदूम, राहुल इंगवले, यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी सभेस उपस्थित होते.

