MPSC परिक्षेसाठी जिल्ह्यातील 83.71 उमेदवार उपस्थित
schedule11 Jan 26 person by visibility 81 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट क संयुक्त पुर्व लेखी परीक्षा 2025 ही परीक्षा रविवार दि 11 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत पार पडली .
जिल्हृयातील महाविद्यालये व हायस्कूल अशा एकूण 40 उप केंद्रावर ही परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 11 हजार 494 परीक्षार्थी बसले होते त्यापैकी 9 हजार 622 उमेदवार हजर तर 1 हजार 872 उमेदवार गैरहजर होते म्हणजेच 83.71 टक्के इतक्या उमेदवारांची उपस्थिती होती.
या सर्व परीक्षा केंद्रावर कामकाजाकरिता पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल जॅमर, बसविण्यात आले होते. तसेच परीक्षार्थीची बायोमेट्रीक पडताळणी व फ्रिस्किंग करण्यात आली. या सर्व केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार अथवा अनियमितता घडलेली नसल्याचे परीक्षा नियंत्रक तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली .

