महास्वच्छता मोहीमेत 30 टन कचरा संकलित; स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
schedule27 Feb 26 person by visibility 65 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : ‘माझं शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकातर्फे आज पहाटे 7.00 वाजल्यापासून शहरात व्यापक महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 30 टन कचरा गोळा करण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते, दुभाजक आणि फुटपाथांची साफसफाई करण्यात आली असून साचलेली खरमाती, तणकट तसेच अडथळा निर्माण करणारी झाडे-झुडपे हटविण्यात आली.
तावडे हॉटेल येथील शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापौर रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महापौर रुपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापौरांनी शहरातील विविध भागांना भेट देत सेवाभावी संस्थांसमवेत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. कावळा नाका येथे छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याची पाण्याच्या पाईपद्वारे पाणी मारुन स्वच्छता करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृहनेते मुरलीधर जाधव व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.
उपमहापौर अक्षय जरग व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी रंकाळा चौपाटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून उपमहापौर अक्षय जरग यांनी स्वत: दुचाकीवरुन रंकाळा परिसरात धूर फवारणीही केली. यावेळी शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ उपस्थित होते.
ही मोहीम शेंडा पार्क ते इंदिरा सागर हॉल, आर.के. नगर नाका ते शेंडा पार्क चौक, रंकाळा टॉवर ते तलवार चौक, तलवार चौक ते शालिनी पॅलेस, तलवार चौक ते चिवा चौक (जुना वाशी नाका), रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, दसरा चौक ते उमा टॉकीज ते रेणुका मंदिर चौक ते हॉकी स्टेडियम, छ. शाहू मिल चौक ते केएसबीपी चौक ते टेंबलाई नाका, कावळा नाका ते दाभोळकर कॉर्नर चौक ते दसरा चौक, टेंबलाई नाका ते कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक, सीपीआर चौक ते कलेक्टर ऑफिस चौक ते धैर्यप्रसाद हॉल तसेच तावडे हॉटेल ते कावळा नाका या मुख्य मार्गांवर राबविण्यात आली.
या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, तालीम मंडळे, निसर्गप्रेमी संघटना तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कोल्हापूर जिल्हा ऑटिकल वेलफेअर असोसिएशन, हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्था, वृक्ष वल्ली संस्था, सावली केअर सेंटर, सावली सोशल सर्कल, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता उपक्रम राबविला.
महास्वच्छता मोहिमेमुळे शहर स्वच्छ व सुशोभित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून नागरिकांनी नियमितपणे स्वच्छता राखावी, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
या महास्वच्छता मोहिमेत गटनेता इंद्रजित बोंद्रे सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम, प्रतापसिंह जाधव, नगरसेवक विशाल चव्हाण, अमर समर्थ, विनायक फाळके, दिलशाद मुल्ला, उमेश पोवार, रोहित कवाळे, नियाज खान, आश्किन आजरेकर, बबन उर्फ अभिजीत मोकाशी, प्रविण सोनवणे, विनायक कारंडे, विजेंद्र माने, नगरसेविका मानसी लोळगे, पल्लवी देसाई, अर्चना कोराने, पुर्वा राणे, माधूरी नकाते, स्वालिया बागवान, दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, महादेव फुलारी, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, सर्व विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.