अवकारिका' सिनेमा महापालिकेच्या 492 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाहिला
schedule08 Aug 25 person by visibility 194 categoryसामाजिक

▪️शारंगधर देशमुख फाउंडेशन व आजरेकर फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम
कोल्हापूर : शारंगधर देशमुख फौंडेशन व आजरेकर फौंडेशन कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या सामाजिक जाणीवेत वाढ करण्याच्या उद्देशाने, 'अवकारिका' या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आज शुक्रवारी दुपारी 3 वाजता शाहू चित्रमंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा चित्रपट महापालिकेच्या 492 सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिला.
हा चित्रपट सफाई कामगार आणि समाजातील विषमता यावर भाष्य करणारा असून, त्यांच्या जीवनातील संघर्ष, आत्मसन्मान व सामाजिक भावनावर प्रकाश टाकतो. समाजाचा अविभाज्य घटक असलेला, नेहमीच दुर्लक्षित राहिलेला व आपल्या आरोग्याची काळजी करणारा सफाई कर्मचारी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये विराट मडके हा कोल्हापूरचा कलाकार प्रमुख आहे.
"सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान समाजासाठी अमूल्य आहे. वास्तवात आपण सर्व नागरिक कचरा निर्माण करतो त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कचरेवाला न म्हणता आपण त्यांना स्वच्छता दूत असे म्हटले पाहिजे. त्यांच्या सन्मानार्थ'अवकारिका' या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख माजी महापौर निलोफर आजरेकर, कलाकार विराट मडके दिग्दर्शक अरविंद भोसले म्युझिक डायरेक्टर श्रेयस देशपांडे माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिगंबर फराकटे तात्या खेडकर रशीद बारगीर अभिजीत चव्हाण संभाजी जाधव, संजय सावंत, अरुण बारामते नगरसेविका रीना कांबळे अशपाक आजरेकर उपायुक्त कपिल जगताप परितोश कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील किरण पाटील इस्माईल बागवान पार्थ मुंडे सचिन मोहिते विक्रम कांबळे सुशांत पवार सर्व आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.