SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन अवकारिका' सिनेमा महापालिकेच्या 492 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाहिलाडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधनभागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया आणि स्नेह, कारागृहातील बंदीजन भारावलेनांदणीच्या नागरिकांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन, मानले आभारग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलनकोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागूखासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची भेट, केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी वर्गसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे विद्यापीठात प्रदर्शन सुरू; ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उपक्रम

जाहिरात

 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन

schedule08 Aug 25 person by visibility 145 categoryसामाजिक

▪️आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आमदार सतेज पाटील यांनी मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता एल्गार पुकारला असून आज शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मागण्या मान्य न केलास 18 ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रापंचायत कर्मचाऱ्यांनी दिला. तर या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्याबाबत, आपणं पाठपुरावा करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे त्याचबरोबर राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे 3 हजार 410 रूपये राहणीमान भत्ता लागू करून मागील फरकाची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्याकरिता कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आज शुक्रवारी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही, तर 18 ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनात सहभागी होत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

राज्यभरात सुरू असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही कळवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण विकासाचा कणा असून त्यांचे पगार थकवणे चुकीचे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी जे शासन निर्णय घेण्यात आलेत, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आणि मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील आमदार सतेज पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे यांनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी शासनाचे याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र अद्यापही या मागण्या प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितले. गेली चार महिने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार मिळालेला नाही. याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत  मार्फत वार्षिक विमा काढण्यात यावा. त्याचबरोबर दहा टक्के आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करावी आणि रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावेत आदी मागण्या त्यांनी यावेळी बोलताना केल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. भविष्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सोबत रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू  असेही देवणे यांनी सांगितले. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बबन पाटील, रवी कांबळे अशोक पाटील,.परशराम जाधव, अशोक गेंगे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कर्मचारी मोठ्या संख्येन आंदोलनात सहभागी होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes