शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन
schedule08 Aug 25 person by visibility 68 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी शिक्षणशास्त्र अधिविभाग येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या उपस्थितीत पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. रूपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.