संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात
schedule08 Aug 25 person by visibility 155 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक या भव्य क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गोव्याच्या 182 हून अधिक शाळांमधील 1229 विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सलग तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलिस अधिकारी, सांगली हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय खेळाडू व पोल व्हॉल्टर सौ. व्ही. एस. सुरेखा, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. विद्या सिरसे, संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले, सीबीएसई निरीक्षक प्रमोद पाटील, कोल्हापूर ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव श्री. प्रकुल मांगोरे पाटील व शाळेच्या संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रणिल गिल्डा यांनी उसेन बोल्टच्या प्रेरणादायी जीवनाचा उल्लेख करत शिस्त, मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करण्याचे महत्व पटवून दिले. ज्याने विश्वविक्रम करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतली. खेळाडूंनी ही मूल्ये अंगी बाणवून जीवनात उत्कृष्टता साधावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडास्पर्धेची शपथ घेतली. . सांस्कृतिक नृत्य व स्वागत गीतांनी उद्घाटन सोहळ्याला रंगत आणली.
यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले, "या क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना आपली क्रीडा कौशल्ये सादर करण्याची, उच्चस्तरीय स्पर्धेत उतरण्याची आणि संघभावना व क्रीडास्पृहा आत्मसात करण्याची संधी मिळाली. खेळाडूंनी स्वतःला सर्वोत्तम बनवावे, प्रत्येकवेळी शिकत रहावे. अपयश हा यशाचा अडथळा नाही, तो यशाचा भाग आहे" प्रत्येक ऍथलीटने कामगिरी वाढविण्यासाठी सातत्याने कठोर परिश्रम केले पाहिजेत. ॲथलीट्सनी चंद्राकडे लक्ष्य ठेवावे जेणेकरून आपण किमान ताऱ्यांपर्यंत पोहोचू शकू. तसेच ऍथलिट या शब्दाचा अर्थही त्यांनी सांगितला व सस्मिता मोहंती यांचे या सुयोग्य नियोजनाबद्दल अभिनंदन ही केले. सीबीएसई ने या स्पर्धेचे नियोजन आपल्याकडे दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. भारतातील नंबर वन शाळा बनण्याचा प्रयत्न संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल नक्कीच करेल अशी आशा व्यक्त केली.
या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली व सर्व शिक्षक शिक्षिका परिश्रम करत आहेत. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने केलेले हे आयोजन नक्कीच तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरेल.