निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 57 वी पेन्शन अदालत
schedule07 Aug 25 person by visibility 198 categoryराज्य

कोल्हापूर : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी 57 वी पेन्शन अदालत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी 11.30 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई - 400 001 येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे प्रवर डाक अधीक्षकांनी दिली आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झाला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्जाच्या तिप्पट प्रती, वरिष्ठ लेखा अधिकारी, सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी. ओ. भवन, पहिला मजला, मुंबई - 400 001 येथे 19 ऑगस्ट 2025 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुपाने (तक्रारींची मोठ्या प्रमाणात /इतरांच्या वतीने नाही) पाठवायची आहे. 19 ऑगस्ट नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.