विठू माऊली केअर सेंटर वृध्द व अंथरुनाला खिळलेल्या रुग्णांसाठी सेवा देणार
schedule08 Aug 25 person by visibility 146 categoryसामाजिक

कोल्हापूर : कणेरीमठ रोड, वॉटर फिल्टर हाऊस रोड, गणेश मंदिर शेजारी विठू- माऊली सेवा चारिटेबल ट्रस्टसंचलित विठू-माऊली केअर सेंटर वृध्द व अंथरुनाला खिळलेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे.या सेंटरच्या माध्यमातून वृध्द व अंथरुनाला खिळलेल्या रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.नुकतेच कणेरी गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
या सेंटरद्वारे २४ तास राहण्याची सोय,रोज नवनवीन फिजिकल ऍक्टिव्हिटी,उत्तम जेवण व नाश्त्याची सोय, नियमितपणे डॉक्टर तपासणी, अनुभवी मनमिळावू नर्सिंग स्टाफ,मनोरंजनसाठी टीव्ही भजन कीर्तन व इतर का सांस्कृतिक कार्यक्रम,रोज सकाळी योगा व्यायाम आदी सेवा दिली जाणार आहे. तरी घराचे घरपण व आपुलकी माया देणारे-विठू माऊली केअर सेंटर गरीब आणि गरजूंसाठी सुरू झाले आहे.
अधिक माहितीसाठी विठू-माऊली केअर सेंटर कार्यकारिणी मंडळ विनोद पोवार, आकाश पोवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.