कोल्हापुरातील जनतेचा 'संघ गंगा के तीन भगीरथ' नाटकास प्रतिसाद
schedule07 Aug 25 person by visibility 241 categoryराजकीय

कोल्हापूर : राष्ट्रीय सेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्या निमित्य शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने संघ गंगा के तीन भगीरथ हे दोन अंकी नाटक कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रथमता दीपक प्रज्वलन भारत माता प्रतिमा पूजन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या दोन अंकी नाटकाला सुरुवात करण्यात आली.
या नाटकाचे कोल्हापुरातील संयोजन मराठा भवन ट्रस्ट व त्याचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आले याप्रसंगी या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हेदेखील उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना महेश जाधव म्हणाले की संघाला 100 वर्षे पूर्ण होत असताना अशा पद्धतीचे नाटक मराठा भवन ट्रस्टच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कोल्हापूरमध्ये सादर करायला मिळते हा माझ्या जीवनातील प्रमुख क्षण आहे तसेच याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांत दादा म्हणाले शंभर वर्ष पूर्ण झाल्या निमित्य इथे उपस्थित असणाऱ्या सर्व स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांनी संघाचा विचार घराघरापर्यंत अजून ज्या ठिकाणी पोचलेला नाही त्या ठिकाणी पोचवणे ही विशेष जबाबदारी असणार आहे तसेच संघ विचाराला दलित शोषित पीडित समाजापर्यंत पोहोचवणे व या देशाला परम वैभव प्राप्त करून देणे हेच आपले किती कर्तव्य असणार आहे.
या दोन अंकी नाटकाला कोल्हापुरातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला तसेच हे नाटक संपल्यानंतर अनेक संघ स्वयंसेवकांनी अतिशय उत्तमरित्या हे नाटक सादर केल्याबद्दल ह्या नाटकाचे संयोजन करणाऱ्या पेंडसे दांपत्याला पेंडसे दांपत्याचे विशेष आभार मानले म्हणले याप्रसंगी आप्पासाहेब दड्डीकर डॉक्टर सूर्यकिरण वाघ प्रमोद ढोले प्रफुल्ल जोशी मुकुंद भावे केदार जोशी तसेच हेमंत आराध्य संतोष दिवटे सतीश अंबडेकर विराट चिखलीकर अमर साठे गायत्री राऊत रविकिरण गवळी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच याप्रसंगी माननीय नामदार चंद्रकांत दादांच्या शुभहस्ते नितीन वाडीकर अजून जमादार इत्यादी या कार्यक्रमाला हातभार लावलेल्या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.