SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देशगुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुःख व्यक्तएअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित"डेटा" हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन - श्रीनिवास पी. एम; डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा उत्साहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजलीअहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यूआषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून

जाहिरात

यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या ६ विद्यार्थ्यांची स्नायडर इलेक्ट्रिक लि. पुणे या कंपनीत वार्षिक ३.७५ लाख पॅकेजवर निवड

schedule17 May 25 person by visibility 431 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या कॅम्पस मधुन ६ विद्यार्थ्यांची  स्नायडर इलेक्ट्रिक लि. पुणे या कंपनीत वार्षिक ३.७५ लाख पॅकेजवर निवड झाली  आहे.

सदरच्या कॅम्पस मध्ये पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील मधुरा  सुतार, विद्या कुंभार, तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील सानिका मोरे, पुनम टाकमारे, तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील श्वेता दिवटे, स्नेहल मोरे यांची  वार्षिक ३.७५ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे.
          
स्नायडर इलेक्ट्रिक ही ‌आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी असुन ती उर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य आहे. ही कंपनी स्मार्ट ग्रिड आणि ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स,
ऑटोमेशन सिस्टीम्स, कंट्रोल पॅनेल्स, सर्किट ब्रेकर, स्विचगियर, इन्व्हर्टर्स, डिजिटल डाटा ‌आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स अशा सेवा देते. भारतातील अनेक महत्त्वाच्या स्मार्ट सिटी, डेटा सेंटर व उद्योग प्रकल्पांमध्ये स्नायडरचा मोठा वाटा आहे. आधुनिक युगातील स्मार्ट सोल्यूशन्स आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यामुळे ही कंपनी जगातील ऊर्जा क्षेत्रात अग्रस्थानी आहे.

 स्नायडर इलेक्ट्रिक  कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्यूव आयोजित केला होता. त्यामधून कॅम्पस इंटरव्यूव प्रोसेस मध्ये टेक्निकल राऊंड एप्टीट्यूड टेस्ट तसेच पर्सनल एचआर इंटरव्यूव इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली.

 डी के टी ई मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. स्नायडर इलेक्ट्रिक ही युवा अभियंत्यांसाठी एक उत्तम करिअर प्लॅटफॉर्म आहे. कंपनी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, इन्टर्नशिप्स आणि कॅम्पस रिक्रूटमेंटद्वारे ‌अभियंत्यांना जागतिक स्तरावर काम करण्याची संधी देते. डी के टी ई संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे मनोगत मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले.

 या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, डी के टी ई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे,  उप प्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एम. बी. चौगुले, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes