SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण; तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसादडीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा धनादेश सुपुर्तचोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरू

जाहिरात

 

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात

schedule15 Aug 26 person by visibility 184 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या वतीने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संघाच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. यावेळी नेर्ली हायस्कूल, नेर्ली येथील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, ‘वंदे मातरम्’ तसेच समूहगीत सादर केले.

 गोकुळ प्रकल्पाबरोबरच संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांच्या हस्ते, डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लिंगनूर चिलिंग सेंटर येथे शशिकांत गायकवाड, तावरेवाडी चिलिंग सेंटर येथे सुनिल चेंडके, गोगवे चिलिंग सेंटर येथे युवराज चौगले, शिरोळ सॅटेलाईट डेअरी येथे दिलावर पखाली, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे मानसिंग देशमुख, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे व्ही. टी. पाटील तसेच बोरवडे चिलिंग सेंटर येथे आनंदा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संबंधित चिलिंग सेंटर वरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सहा. महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ. दयावर्धन कामत, व्यवस्थापक (संकलन) दत्तात्रय वाघरे, धनाजी पाटील, डॉ. प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी आप्पासो शिंदे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes