कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन
schedule15 Aug 26 person by visibility 157 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूर येथील सायबर पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात आले असून, भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
हा उद्घाटन सोहळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा (भा.पो.से.) यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की, श्रीमती प्रिया पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण कागलेकर, महिला शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस बँडच्या संगीतमय वातावरणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.