निवडणूक आयोगाच्यामते महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार : राहुल गांधींचा मोठा आरोप, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद
schedule07 Feb 25 person by visibility 319 categoryदेश

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या समवेत खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी संयुक्त पत्रकार बैठक झाली. या पत्रकार बैठकीमध्ये खासदार राहुल गांधी म्हणाले "२०१९-२०२४ मध्ये ३२ लाख मतदार जोडले गेले, २०२४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार जोडले गेले. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आम्ही फक्त लोकसभेत महाराष्ट्राची मतदार यादी आणि विधानसभा निवडणुकीत मतदार यादीची मागणी करत आहोत." ते पुढे म्हणाले की, २०१९ ते २०२४ या विधानसभा काळात ३२ लाख मतदार होते. लोकसभा २०२४ आणि विधानसभा २०२४ दरम्यान ३९ लाख मतदार होते. हे अतिरिक्त मतदार कुठून येतात? पाच वर्षांत जितके मतदार जोडले गेले त्यापेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार जोडले गेले.
यासोबतच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, "महाराष्ट्रातील मतदार यादीतील तफावत गंभीर अनियमितता दर्शवते. मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयाचे अंतर मतदार यादीत जोडलेल्या फरकाइतकेच आहे."
सरकारच्या मते, महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. निवडणूक आयोगाच्या मते, महाराष्ट्रात ९.७ कोटी मतदार आहेत. याचा अर्थ असा की निवडणूक आयोग देशातील जनतेला सांगत आहे की महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका व्यक्त केली.