SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेसार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईकअंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठी नियोजन करा : मंत्री, हसन मुश्रीफहोळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सणपालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

जाहिरात

 

पालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

schedule13 Mar 25 person by visibility 160 categoryआरोग्य

▪️राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहीम

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार 1 मार्च 2025 रोजी वि.मं. वाकरे, ता. करवीर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच आश्रमशाळा या ठिकाणी आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले असून पालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी केले आहे.

या मोहिमेअंतर्गत सर्व मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर उपचार, विशेष आजारांच्या मुलांना संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. यात जन्मजात व्यंग कमतरता, विकासात्मक विलंब व आजार यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात येतील.

करवीर तालुक्यात सेवा रुग्णालय, कसबा बावडा अंतर्गत तीन पथके कार्यरत असून 31 मार्च 2025 पर्यंत शाळा व अंगणवाडी आरोग्य तपासणीचे वेळापत्रक करण्यात आले आहे. दि. 15 मार्च - गडमुडशिंगी, कोगिल  खुर्द, दि. 17 मार्च - सरनोबतवाडी, कणेरीवाडी, नंदवाळ-पिरवाडी, दि. 18 मार्च - कंदलगाव, पाचगाव व भुये- जठारवाडी, दि. 19 मार्च - मोरेवाडी, पाचगाव, केर्ले, दि.20 मार्च - भुयेवाडी, पाचगाव, केर्ली, दि. 21 मार्च - गडमुडशिंगी, पाचगाव, वडणगे, दि. 22 मार्च - गडमुडशिंगी, जैताळ, वडणगे, दि. 24 मार्च- पाचगाव, वरणगे, बेले याप्रमाणे करण्यात आले आहे, अशी माहिती करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. निलिमा पाटील यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes