SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटला "बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५" पुरस्कारपालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवारशहापुरात मित्राचा खून; संशयित ताब्यातराज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सोमवारपासून सुरुवात; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागतशासनाकडून सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती अदाकोल्हापुरात ट्रीपलसिट दुचाकी चालविणारे १३७, एकेरी मार्गाचे उल्लंघन करणारे १०५ वाहनधारकांवर दंडात्मक मोठी कारवाईसन 2024-25 कायाकल्प पुरस्कारात कोल्हापुरातील श्री पंचगंगा रुग्णालय राज्यात प्रथमकोल्हापुरात अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीउघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती..!

जाहिरात

 

कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

schedule13 Jun 25 person by visibility 239 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरामध्ये गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात 20 ठिकाणी पाणी साचले होते. या ठिकाणी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी पाहणी केली. या ठिकाणी कोणत्या कारणाने पाणी साचले याची त्यांनी माहिती घेऊन संबंधीत अधिका-यांना तेथे तातडीने उपाययोजना करुन सफाई करण्याच्या सूचना दिल्या.

शहरामध्ये गुरुवारी साधारणत: 50 मि.मि.च्या वर पाऊस अवघा 3 तासात पडला होता. महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याने काल भर पावसात पाणी साठलेल्या भागातील पाणी निचरा करण्याचे काम रात्रौ उशिरापर्यंत सुरु होते. यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी, आरोग्य निरिक्षक व आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरुन काम करत होते. सकाळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी कसबा बावडा वेटोळे मळा, कमदवाडी जाधववाडी रोड, मेनन बंगल्याजवळील आयाप्पा स्वामी मंदिर, परिख पुल, दसरा चौक, जनता बझार चौक, रंकाळा चौपाटील या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी चॅनेल ब्लॉक झालेत त्या त्या ठिकाणी सातत्याने स्वच्छता व चॅनेल साफ करावेत. त्याचबरोबर मुख्य रस्त्याच्या कडेला स्ट्रॉम वॉटरसाठी असलेले व्हीप होल गाळाने भरले असल्यास ते क्लीन करा. नाल्यातून वाहून येणारे प्लॅस्टीक वेळोवेळी काढण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दिल्या. रस्त्यावरील जे मेनहोल खाली गेलेत ते उचलून घ्याव्यात, मोठे खड्डे पडलेत ते मुजवून घ्यावेत, मुख्य रस्त्यावर कामासाठी खड्डे काढले असतील तर तेथे बॅरेकेट लावून घेण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.

  यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, जल अभियंता रमेश मस्कर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes