SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"बाजी"श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन; नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन; मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान; मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटू सत्कारकोण गेलं- आलं फरक पडत नाही, जनता आमच्या सोबत, आमदार सतेज पाटलांनी ठोकला शड्डू आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे वाटप...संजय घोडावत इन्स्टिट्यूटला "बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५" पुरस्कारपालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवारशहापुरात मित्राचा खून; संशयित ताब्यातराज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सोमवारपासून सुरुवात; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला "बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५" पुरस्कार

schedule14 Jun 25 person by visibility 307 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत एज्युकेशन समिट २०२५ मध्ये संस्थेला "बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर" हा मानाचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.  आशिष शेलार आणि उत्तर प्रदेश राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.  आशिष सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इन्स्टिट्यूट चे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी  पुरस्कार स्वीकारला आहे. 

शिक्षणाच्या क्षेत्रातील उत्तुंग कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योग संलग्न अभ्यासक्रमांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटने केलेल्या कामाचे हे मोठे गौरवचिन्ह ठरले आहे.

"पुरस्कार स्वीकारताना इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. गिरी म्हणाले  सर्व विभागाचे विभागप्रमुख, सर्व विषयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अविरत परिश्रम आणि एकसंघ प्रयत्न आहेत. संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, स्टार्टअप्ससाठी पोषक वातावरण, आणि नवनवीन प्रयोगशील उपक्रमांची रचना करून दिली आहे. म्हणून हे इन्स्टिट्यूट आदर्श शिक्षणसंस्था म्हणून स्थान निर्माण करत आहे."

संजय घोडावत इन्स्टिट्यूटने मिळवलेल्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षा होत आहे. 

संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन  संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,  यांनी या पुरस्काराबद्दल  सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, भविष्यात आणखी उच्च शिखरे गाठण्याचा शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes