शहापुरात मित्राचा खून; संशयित ताब्यात
schedule14 Jun 25 person by visibility 208 categoryगुन्हे

यड्राव : शहापूर येथे गावाकडील जुन्या वादातून गणेश रमेश पाटील (वय 21) (रा. आगर ता. शिरोळ) या मित्राला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्य झाला. ही घटना लोटस पार्क कमानी समोरील शहापूर हद्दीत मोकळ्या मैदानात शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी अभिषेक सुकुमार मस्के (वय 19) रा. आगर ता. शिरोळ याला पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून दोन वर्षांपूर्वी गावाकडील काही वाद होता. या रागातून लोटस पार्क कमानी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये वाद झाला. यातून अभिषेक यांने कोयत्याने गणेशवर वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. मार्गावरून येणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन गणेशला इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले.
गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.