कोल्हापुरात ट्रीपलसिट दुचाकी चालविणारे १३७, एकेरी मार्गाचे उल्लंघन करणारे १०५ वाहनधारकांवर दंडात्मक मोठी कारवाई
schedule13 Jun 25 person by visibility 302 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये ट्रीपलसिट दुचाकी चालविणारे १३७ वाहनधारकांवर व एकेरी मार्गाचे उल्लंघन करणारे १०५ वाहनधारकांवर २,०२,५००/- दंड आकारणी करण्यात आली ही विशेष कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आली
कोल्हापूर शहरात ट्रीपलसीट दुचाकी चालविण्याचे प्रकारात वाढ झालेने पोलीस अधीक्षक. योगेशकुमार गुप्ता, यांनी जे वाहनधारक दुचाकी वरुन ट्रीपलसिट फिरुन वाहतूक नियमांचा भंग करीत आहेत अशा वाहनचालकांविरुध्द विशेष व्यापक मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अजित टिके सोो यांचे मार्गदर्शना नुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांचे वतीने मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवरील कारवाई दरम्यान दिनांक १२/०६/२०२५ रोजी व दिनांक १३/०६/२०२५ रोजी पर्यंतचे दोन दिवसांचे कालावधीत कोल्हापूर शहरात एकुण १३७ दुचाकी वाहनधारकांवर ट्रीपलसीट बाबत कारवाई करून १,३७,०००/- इतका दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच एकेरी मार्गाचे उल्लंघन करणारे १२१ वाहनधारकांवर कारवाई करुन ६५,५००/-रु.इतका दंड आकारण्यात आलेला आहे.
तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरचे वतीने सर्व दुचाकी वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, सध्या पावसाळा सुरु असून दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालवु नयेत. वाहने स्लिप होण्याची शक्यता आहे. कोणीही वाहनधारक यांनी दुचाकी वाहनावर ट्रिपलसिट फिरु नये तसेच एकेरी मार्गाचे उल्लंघन करुन मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करु नये अशा वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी आपल्यावर होणारी होणारी कायदेशीर दंडात्मक कारवाई टाळावी.
ही कारवाई शहर वाहतुक शाखेकडील प्रभारी अधिकारी पो. नि. नंदुकुमार मोरे यांचे निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.