SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार 'भारत पर्व 2026'प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीमसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रमशाहू वस्तुसंग्रहालय खुले करा, ...अन्यथा शाहू जन्मस्थळ येथे सोमवारी शाहूप्रेमी कोल्हापूरकरांचा उपोषणाचा इशारापश्चिम विभागीय अन्वेषन संशोधन स्पर्धा २०२५ -२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे यश हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय कार्यशाळा'थेट बाजारपेठ व्यवस्थापन' मोफत प्रशिक्षण २७ जानेवारी पर्यंत नावनोंदणीची संधी शिवाजी विद्यापीठात ‘भारतीय विद्येचा परिचय’अभ्यासक्रम उत्साहातकवी होण्याची पूर्वअट म्हणजे माणूस होणे : अजय कांडर; विद्यापीठातील ‘कविकट्टा’ झाला काव्यमय!

जाहिरात

 

अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चौघे जखमी

schedule22 Nov 25 person by visibility 149 categoryगुन्हे

बीड  : उपमुख्यमंत्री अजित पवार धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीची धूनकवड फाटा परिसरात  दुचाकीला धडक बसल्याने नवरा-बायको आणि दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी  तत्परतेने मदत करत जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या धडकेत ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला . त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes