अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर व के.एम.टी. उपक्रमाच्यावतीने प्रवासी दिन उत्साहात
schedule04 Feb 25 person by visibility 328 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रथसप्तमी प्रवासी दिनाचे आयोजन श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे सकाळी 10.00 वा. करणेत आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उप आयुक्त श्रीमती साधना पाटील यांचे हस्ते के.एम.टी. बसचे पूजन करुन प्रवाशांना गुलाब पुष्प आणि तिळगुळ वाटप करुन शुभेच्छा देणेत आल्या.
यावेळी वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव, ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र घाटगे, महानगर अध्यक्ष कमलाकर बुरांडे, महानगर संघटक सुहास गुरव, सेक्रेटरी श्री.विनायक वाळवेकर, सह संघटक श्री.प्रशांत चौगुले यांनी प्रवाशांना प्रवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास वर्क्स मॅनेजर दिपक पाटील, कामगार अधिकारी प्रदिप म्हेतर, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, इश्यु-कॅश अधिक्षक नितीन पोवार, स्थानक प्रमुख संग्रामसिंह काशिद, सुनिल आकिवाटे, अमेय जाधव, तौफिक भालदार, वाहतूक नियंत्रक देवराम दिघे, हनुमान लोहकरे, चालक निदेशक नंदकुमार काळे, सागर वंजारी, हेमंत हेडाऊ, मोहन मुदगूण, मृणाल गायकवाड तसेच के.एम.टी.च्या सर्व विभागांकडील कर्मचारी व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.