शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात
schedule23 Feb 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे माजी विद्यार्थी,पालक मेळावा व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहत झाला. याप्रसंगी अधिविभागातील वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षाचे माजी विद्यार्थी ऑनलाइन व प्रत्यक्ष उपस्थित होते. त्याचबरोबर विभागातील एम.एड,बी.एड ,एम.एड (एकात्मिक) बी.एससी. बी.एड (ITEP) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे पालक ऑनलाइन व प्रत्यक्ष उपस्थित उपस्थित होते.
यावेळी अधिविभागात “निसर्ग मंडळाचे” उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ.माधुरी वाळवेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार अभिनव पद्धतीने करण्यात आला, निसर्ग व जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीकोनातून ‘बीजसंग्रह’ यामध्ये विविध वनस्पतींच्या बीजांची पेटी बनविण्यात आली असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक बीजांची साठवणूक करतात व त्यामधून ‘सीड बॉल्स’ बनवायचे व गरजूपर्यंत ते पोहोचवायचे त्याचप्रमाणे बीजमाता पद्मश्री विजेत्या राहीबाई पोपेरे यांच्याकडून देखील १४ प्रकारच्या प्रजातींच्या बिया अधिविभागाकडून मागविण्यात आल्या आहेत व त्या अधिविभागामध्ये येणाऱ्या प्रमुख अतिथीना, माजी विद्यार्थ्यांना ,पालकांना बियांची पोटली देवून व टाकाऊ कागदापासून तयार केलेली फुले सत्कार प्रसंगी देवून संकल्पना रुजविण्याचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. अधिविभागातील सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
याप्रसंगी अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र. सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले तर प्रस्तुत कार्यक्रमाच्या संयोजन डॉ. रुपाली संकपाळ यांनी केले. पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद डॉ. विद्यानाद खंडागळे यांनी साधला. सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी ऐश्वर्या मरूथूवर, व राजनंदिनी यांनी केले तर प्रशिक्षणार्थी राहुल माने यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य एम.व्ही .शेख ,प्रदीप पाटील ,प्रमोद तांदळे ,नगीना माळी,अफसाना मणेरी ,उमेश बेनके ,अनिजा सूर्यवंशी ,रुपाली भारमल, धीरज घाडगे व अधिविभागातील सर्व प्राध्यापक ,शिक्षक, संशोधक, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.