कागल बुद्धिबळ स्पर्धेत श्रेयस पाटील अजिंक्य.अद्विक विचारे उपविजेता
schedule23 Feb 26 person by visibility 123 categoryक्रीडा
कोल्हापूर : अनुज् चेस ॲकॅडमी व डी. आर. माने महाविद्यालयातर्फे डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे घेण्यात आलेल्या शालेय 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन विरेंद्र माने व प्राध्यापक संतोष जेटीथोर यांचे हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.
स्पर्धेमध्ये 6 फेऱ्या घेण्यात आल्या. अंतिम फेरीमध्ये पहिल्या पटावर श्रेयस पाटील याने अथर्व कुंभार वर मात करत 6 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. दुसऱ्या पटावर अद्विक विचारे याने ओजस व्हनमाने ला पराभूत करत 6 गुण (प्रोग्रेसिव्ह) मिळवून उपविजेतेपद पटकाविले. तिसऱ्या पटावर प्रेम नीचळ ने सोहम कुलकर्णी ला पराभूत करत 5 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला
▪️स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे-
तृतीय क्रमांक प्रेम नीचळ 5 गुण
चौथा क्रमांक रुद्र माने 5 गुण
पाचवा क्रमांक अथर्व कुंभार 5 गुण
सहावा क्रमांक आयुश करमरकर 5 गुण
सातवा क्रमांक ओजस व्हनमाने 4.5 गुण
आठवा क्रमांक अच्युत डवणे 4 गुण
नववा क्रमांक सोहम कुलकर्णी 4 गुण
दहावा क्रमांक श्रीयोग कोरवी 4 गुण
अकरावा क्रमांक वरद पुणेकर 4 गुण उत्कृष्ट विद्यार्थिनी शमिता पाटील 4 गुण
16 वर्षाखालील इतर विजेते :-
8 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक स्वरीत गवंडी 4 गुण
द्वितीय क्रमांक श्रीनय पालनकर 3.5 गुण
तृतीय क्रमांक कृष्णराज चव्हाण 3 गुण
चौथा क्रमांक मंथन पाटील 2 गुण
पाचवा क्रमांक मयुरेश पाटील 2 गुण
▪️10 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक वनीरे संस्कार 4 गुण
द्वितीय क्रमांक जय पाटील 4 गुण
तृतीय क्रमांक लवेश पाटील 3 गुण
चौथा क्रमांक शिवम साबळे 3 गुण
पाचवा क्रमांक शौर्य आवटे 2 गुण
▪️उत्कृष्ट विद्यार्थिनी अलविना नदाफ 1 गुण
▪️12 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक आर्यन पाटील 5 गुण
द्वितीय क्रमांक सुराज गराडे 4 गुण
तृतीय क्रमांक ओम इंगळे 4 गुण
चौथा क्रमांक शिवतेज राजहंस 4 गुण
पाचवा क्रमांक अथर्व लोणीस्टे 3.5गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी शौर्या कांडेकरी 2 गुण
▪️14 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक ऋषिकेश निंबाळकर 5 गुण
द्वितीय क्रमांक आदर्श चौगुले 4.5गुण
तृतीय क्रमांक नुबेद मुजावर 4 गुण
चौथा क्रमांक श्रावणी हटकर 4 गुण
पाचवा क्रमांक हर्षित पाटील 4 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी अफरीन फकीर 3 गुण
▪️अनुज् चेस अकॅडमी विजेते -
प्रथम क्रमांक अथर्व अंबी 3.5गुण
द्वितीय क्रमांक भगवान भारमल 3 गुण
तृतीय क्रमांक आर्यन गुरव 3 गुण
चौथा क्रमांक पाटील दावेश गुण
पाचवा क्रमांक शौर्य कटके 3 गुण
सहावा क्रमांक सइद पिंजारी 3 गुण
सातवा क्रमांक शिवराज फडतारे 3 गुण
▪️स्पर्धेमध्ये एकूण 82 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री बाबूराव पाटील यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण तालुका क्रीडा संघटनेचे माजी अध्यक्ष के बी चौगुले, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव श्री कृष्णात पाटील, अनुज् चेस ॲकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक बाबुराव पाटील, डी आर माने महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास पाटील, प्रा. संग्राम तोडकर, प्रा. विनायक खोत आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.